Palghar Crime | अमली पदार्थ विक्री करणारे अटकेत, 4.80 लाखांचे LSD ड्रग्ज आणि 8.11 किलो गांजा जप्त

अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर वसईच्या गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष -२ मधील सहा.पोलीस उपनिरीक्षक मनोज मोरे आणि मुकेश पवार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरुन केलेल्या कारवाईत देव पंकज मोदी, वय २७ वर्षे, आणि सोहेल युसुफ सय्यद वय २८ वर्ष, यांना ताब्यात घेतले असता त्यांचेकडे ४,४०,०००/- रुपये किंमतीचा ०.४४० मिली ग्रॅम एल एस डी पेपर नावाचा अंमलीपदार्थ मिळून आल्याने त्यांचेविरोधात माणिकपुर पोलीस ठाणे गुन्हा एनडीपीएस अॅक्ट प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून आणखी ८.१११ किलो ग्रॅम गांजा बाळगल्या प्रकरणी सुनिल सुभाष पवार, वय ३८ वर्षे, त्याची पत्नी आशा सुनिल पवार वय ३५ वर्ष, रा. शिवशक्ती चाळ, कल्याण. आणि प्रियंका संतोष कंसारे वय २६ वर्षे, या तिघांना अटक करण्यात आले आहे.

संबंधित व्हिडीओ