Palghar Crime | किरकोळ वाद, मित्राच्या मारहाणीत पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू; जव्हारमधील घटना

दिवाळीच्या सुट्टीत गावी आलेल्या पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर गायकवाड यांचा किरकोळ वादातून दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना जव्हारमध्ये घडली आहे. मित्र निलेश गभाले याच्यासोबत झालेल्या वादादरम्यान त्याने मारलेल्या ठोशामुळे ज्ञानेश्वर गायकवाड गंभीर जखमी झाले होते. चार दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी निलेश गभाले याला अटक केली असून न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

संबंधित व्हिडीओ