Palghar Hospital मारहाण प्रकरण| हायकोर्टाकडून गंभीर दखल, एसपींना हजर राहून अहवाल सादर करण्याचे आदेश

या प्रकरणी न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या खंडपीठाने तीव्र नाराजी व्यक्त करत पालघरचे पोलीस अधीक्षक यांना बुधवारी न्यायालयात स्वतः हजर राहून कारवाईचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. सीसीटीव्ही फुटेजमध्ये काही राजकीय पदाधिकारी आणि कार्यकर्ते डॉक्टरांना शिवीगाळ व मारहाण करताना दिसत असल्याचा दावा करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणी पालघर डॉक्टर असोसिएशनने उच्च न्यायालयात धाव घेतली.

संबंधित व्हिडीओ