Palghar| मेंढवन खिंडीत LPG टँकरचा अपघात, Mumbai-Ahmedabad महामार्गावर वाहनांच्या रांगा | NDTV मराठी

पालघर जिल्ह्यातील मेंढवन खिंडीत मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर आज LPG गॅस टँकरचा अपघात झाल्याने मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. अपघातानंतर टँकर महामार्गावरच पलटल्याने दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. घटनेची माहिती मिळताच कासा पोलीस आणि महामार्ग वाहतूक विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. तब्बल दोन तासांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त टँकर रस्त्याच्या बाजूला करण्यात आला. सध्या महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू असून, कोंडी सोडवण्यासाठी पोलिसांकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत.

संबंधित व्हिडीओ