Palghar | साधू हत्याकांडातील आरोपी काशिनाथ चौधरीच्या BJP प्रवेशानं राजकीय खळबळ, विरोधकांचं टीकास्त्र

पालघरच्या डहाणू तालुक्यातील 2020 मधील गडचिंचले साधू हत्याकांडात आरोप असलेले काशिनाथ चौधरी यांनी तब्बल 4000 पेक्षा जास्त समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केल्याने पालघरची राजकीय समीकरणे हादरली आहेत.चौधरी हे साधू हत्या कांडातील मुख्य आरोपी असल्याचा आरोप त्यावेळी भाजपने केला होता. शिवाय भाजपने याच घटनेवर शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारवर तीव्र टीका केली होती. मात्र आता त्याच आरोपीचा प्रवेश घेतल्याने विरोधकांनी भाजपला “नैतिकता सोडली का?” असा सवाल केला आहे. पक्षप्रवेश करताना काशिनाथ चौधरी यांच्याकडून जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. डहाणूच्या गडचिंचले गावात 16 एप्रिल 2020 रोजी, दोन साधू आणि त्यांचा चालकाला जमावाने दगडफेक आणि जीवघेणा हल्ला करून ठार करण्यात आले होते. या घटनेनंतर तब्बल 200 लोकांना अटक करण्यात आली होती. साधू हत्याकांडांत भाजपने ज्यांच्यावर आरोप केले त्याच काशिनाथ चौधरींच्या हाती कमळ दिल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

संबंधित व्हिडीओ