Kolhapur मध्ये पंचगंगा नदी पात्राबाहेर; नदीची पाणी पातळी 29 फुटांवर, याचाच घेतलेला आढावा

कोल्हापूरमध्ये पंचगंगा नदी पात्राबाहेर पडण्यास सुरुवात झाली. सध्या नदीची पाणी पातळी 29 फुटांवर आहे. 33 बंधारे पाण्याखाली गेलेत.जिल्ह्यातील सर्वच धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. संभाव्य पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन अलर्ट मोडवर आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून बोटीची चाचणी आणि प्रशिक्षण देण्यात येत आहे.आज पंचगंगा नदी पात्र ओलांडल्यानंतर आजुबाजूच्या शेती परिसरात पाणी पसरत.त्यामुळे येणाऱ्या 24 तासात पावसाच प्रमाण जास्त राहील तर कोल्हापूरकरांची धाकधूक वाढणार आहे. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी यांनी.

संबंधित व्हिडीओ