#ShivsenaConflict | #PandharpurViolence | #PoliticalAttack पंढरपूरचे शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्यावर त्यांच्या गाडीला अडवून प्राणघातक हल्ला (Deadly Attack) करण्यात आला आहे. शिवसेना शिंदे गटातील दिग्विजय बागल आणि रश्मी बागल यांनी सुपारी देऊन हा हल्ला घडवून आणल्याचा गंभीर आरोप चिवटे यांनी केला आहे. दिग्विजय बागल हे माजी मंत्री दिगंबर बागल यांचे पुत्र आहेत. या हल्ल्यामुळे शिवसेनेतील अंतर्गत बंडाळीला हिंसक वळण लागल्याचे स्पष्ट झाले आहे. काही दिवसांपूर्वी धमकी दिल्याप्रकरणी चिवटे यांनी दिग्विजय बागल यांच्याविरोधात पोलिसांत तक्रारही दिली होती.