Pandharpur| नवरात्रोत्सवानिमित्त पंढरी सजली, विठ्ठल आणि रुक्मिणी मातेला सुवर्ण अलंकार | NDTV मराठी

शारदीय नवरात्र उत्सवाची सुरुवात झाली आहे. नवरात्र उत्सवाच्या पहिल्याच दिवशी विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचा आकर्षक असे सुवर्ण अलंकार परिधान करण्यात आले होते. सुमारे दोनशे वर्षांपूर्वीचे सुवर्ण अलंकार विठ्ठल आणि रुक्मिणी मातेस परिधान करण्यात आले. यामध्ये विठ्ठलास सुवर्णमच्छ तर रुक्मिणी मातेस सुवर्ण मुकुटासह , सुवर्ण कर्णफुले आणि रेशमी पैठणी परिधान करण्यात आली होती. आज पासून नऊ दिवस विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचे दररोज सुवर्ण अलंकार पूजेसह वेगवेगळ्या प्रकारचे पोशाख परिधान केले जाणार आहेत. याची सुरुवात नवरात्रीच्या पहिल्या माळेनिमित्त झाली.

संबंधित व्हिडीओ