Pandharpur | Kartiki Ekadashi | वारकऱ्यांसाठी Good News,कार्तिकी यात्रेसाठी 1150 जादा ST बसेस धावणार

यंदाच्या कार्तिकी एकादशीला वारकऱ्यांच्या सुखकर प्रवासासाठी एसटी महामंडळाच्या वतीने अकराशे पन्नास नव्या एसटी बसेस सोडण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. यंदाच्या कार्तिकी एकादशीच्या शासकीय महापूजेचा मान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळाला आहे. या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी प्रशासन आणि वारकरी प्रतिनिधींची बैठक घेतली. यावेळी भाविकांना येणाऱ्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यावर तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिल्या. यंदा प्रथमच वारकऱ्यांच्या प्रवासासाठी नवीन बसेस देण्यात येणार आहेत.

संबंधित व्हिडीओ