कार्तिकी वारीच्या तोंडावर पंढरपुरात गोळीबाराची घटना घडलीय.. शिवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजा भिंगे यांच्यावर रात्री दहाच्या सुमारास गोळीबार करण्यात आला. इसबावी परिसरातील राहत्या घरासमोर जेवणानंतर शतपावली करत असताना अज्ञातांनी त्यांच्यावर हल्ला केला.. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.. दरम्यान, राजा भिंगे यांच्यावर यापूर्वी हत्या आणि इतर गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती आहे. या घटनेनंतर पंढरपूर शहरात पोलिसांनी बंदोबस्त वाढवला असून तपास सुरू आहे