Parbhani| MLA प्रतापसिंह पाटलांच्या विजयाचे बॅनर, पवार गटाच्या MLAचा Thackeray गटाकडून प्रचार चर्चेत

परभणीत नवनिर्वाचित आमदार प्रतापसिंह पाटील यांच्या विजयाचे बॅनर ठाकरे गटाकडून लावण्यात आलेत. ठाकरे गटाचे परभणी पालिकेचे सभागृह नेते सय्यद समी माजू लाला यांनी आमदार राहुल पाटील यांना किंग मेकर असा उल्लेख करत बॅनर लावलेत. विशेष म्हणजे या मतदारसंघात ठाकरे गटाने दिलीप घुगे यांना उमेदवारी दिली होती. मात्र ठाकरे गटाचे परभणीचे आमदार राहुल पाटील यांनी शरद पवार गटाचे उमेदवार आणि सखे भाऊ प्रतापसिंह पाटील यांचा खुलेआम प्रचार केला होता.याचा आढावा घेतला आमची परभणीचे प्रतिनिधी नजीर खान यांनी.

संबंधित व्हिडीओ