ऑगस्ट पाठोपाठ सप्टेंबर महिन्यामध्ये सुद्धा परभणी जिल्ह्यात पावसामध्ये मोठी तूट नोंद झालेली आहे. सप्टेंबर महिन्यामध्ये तब्बल 100 मिलिमीटर पेक्षा कमी पाऊस झाला.. तर जूनपासून आजपर्यंत केवळ 432 मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झालीय. विशेष म्हणजे ऑक्टोबर महिन्यामध्ये सुद्धा परतीचा पाऊस फार समाधानकारक राहणार नाही असा अंदाज परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या हवामान विभागाने वर्तवलाय.