अवकाळी पावसाने परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यात जोरदार हजेरी लावत गौंडगावसह परिसरातील शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावून घेतला आहे.... अचानक झालेल्या पावसामुळे शेतातील ज्वारी व हरभरा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.अनेक ठिकाणी पिके आडवी पडली आहेत... काढणीच्या उंबरठ्यावर असलेल्या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.तत्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. संपूर्ण विदर्भ मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात सोमवारी झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे.रब्बी हंगामातील बहरलेली हरभरा, ज्वारी, गहू, बाजरी, कापूस, करडई, पिकं आडवी झाली आहेत.दरम्यान, विदर्भात आणखी तीन दिवस हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे.मराठवाड्यातील परभणी, नांदेड जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा जोर अधिक होता....लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथे गारा पडल्याची माहिती आहे.अहिल्यानगर, सोलापूर जिल्ह्यातही अवकाळी पावसाने द्राक्षबागांसह पिकांचे नुकसान झालं आहे.आंब्याच्या मोहरही गळून पडला आहे.