लातूर जिल्ह्यात मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या कर्जवसुलीच्या पद्धतीवरून वाद अधिकच तीव्र होताना दिसत आहे. वसुली प्रतिनिधी आणि कर्जदारांमधील कथित फोन संभाषणांचे ऑडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतानाच आता आणखी एक ऑडिओ क्लिप समोर आली आहे. या क्लिपमध्ये शेतकरी संघटनेच्या एका पदाधिकाऱ्याशी वसुलीच्या कारणावरून अश्लील आणि अरेरावीची भाषा वापरल्याचा दावा करण्यात येत आहे. या प्रकारामुळे संताप व्यक्त होत असून संबंधितांवर कारवाईची मागणी होत आहे.