Pimpri | आळंदीत होळीनिमित्त माऊलींचा गाभारा सूर्यफुलांनी न्हाला, पाहा सूर्यफुलांची आकर्षक सजावट

होळीच्या मंगलमय पर्वावर श्री क्षेत्र आळंदी येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात सूर्यफुलांची आकर्षक सजावट करण्यात आली.रंगोत्सवाचे औचित्य साधून साकारलेल्या या अनोख्या आरासीमुळे मंदिर परिसर चैतन्यमयी झाला आहे. समाधी मंदिराचा गाभारा हजारो टवटवीत सूर्यफुलांनी सजवण्यात आला आहे. पिवळ्या रंगाच्या या नैसर्गिक छटेमुळे संपूर्ण गाभारा उजळून निघाला आहे. पारंपरिक झेंडू आणि गुलाबाच्या फुलांऐवजी यंदा सूर्यफुलांचा कल्पक वापर करण्यात आला. या सजावटीमुळे मंदिर परिसरात एक वेगळीच प्रसन्नता आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली असून, निसर्ग आणि भक्तीचा हा सुंदर मिलाफ भाविकांना पाहायला मिळत आहे.

संबंधित व्हिडीओ