सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीनंतर राजकीय वाद उफाळून आला आहे. महाविकास आघाडीने फसवणूक केल्याचा आरोप भाजपाचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांनी केला आहे. बँकेची निवडणूक बिनविरोध करताना भाजपाला सोबत घेतलं, मात्र सत्तास्थापनेवेळी बाजूला ठेवल्याचा दावा त्यांनी केला. तसेच अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीत शिंदे गटाने महायुतीचा धर्म पाळला नसल्याचाही आरोप महाडिक यांनी केला आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून राजकारण तापलं आहे. भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.