गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर शहराची ओळख महापूर आणि खड्डेपूर अशीच झाली आहे. शहरातील अनेक रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. पावसाळ्यापूर्वी बनवलेल्या रस्त्यांवर खडी उखडून पडली आहे. गाजावाजा करून कोल्हापूर शहरातील 100 कोटींच्या रस्त्यांनी शहरवासियांना थोडा आराम मिळेल, अशी आशा होती. मात्र, ती आशा सुद्धा टीचभर पावसातच फोल ठरलीये. शहरातील अनेक मार्गावर खड्ड्यांचा महापूर तयार झाला आहे. ऐन पावसाळ्यात नागरिक त्रस्त आहेत. सिग्नल, मुख्य चौक सगळीकडेच खड्डेच खड्डे पाहायला मिळतायत. जाणून कोल्हापुरातील रस्त्यांचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी यांनी