Prahaar Special Interview| कसाबने खरंच बिर्याणी मागितली होती? Ujjwal Nikam यांनी सांगितली खरी स्टोरी

26/11 चा मुंबई दहशतवादी हल्ला म्हटलं की अजमल कसाबचं नाव आजही अंगावर काटा आणतं. मुंबईवर झालेल्या या भीषण दहशतवादी हल्ल्यात शेकडो निष्पाप नागरिकांचा जीव गेला आणि अवघा देश हादरला होता. या प्रकरणात कसाबविरोधात खटला लढवला होता तो ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी. या चित्रपटामध्ये 26/11 हल्ल्याचा मास्टरमाईंड अजमल कसाबला कशापद्धतीने उज्ज्वल निकम यांनी फाशीपर्यंत पोहोचवलं? कशा पद्धतीने कोर्टामध्ये त्यांनी युक्तिवाद केला? हा सर्व थरार आपल्याला पाहायला मिळणार आहे प्रहार या चित्रपटात.... या चित्रपटात राजकुमार राव याने वकील उज्ज्वल निकम यांची भूमिका साकारली आहे...या चित्रपटात मराठमोळा अभिनेता ललित प्रभाकर याने कसाबची भूमिका साकारली आहे. अभिनेत्री वामिका गब्बी आणि जयदीप अहलावत यांच्याही यात प्रमुख भूमिका आहेत. हा सिनेमा येत्या 16 ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या सिनेमाच्या टीमसोबत संवाद साधलाय... आमचे प्रतिनिधी श्रीरंग खरे यांनी...

संबंधित व्हिडीओ