KEM रुग्णालयातील विद्यार्थिनी सेजल पवारवर निलंबनाची कारवाई होणार असल्याची माहिती मिळतीय.प्रणित मोरे कॉमेडी शो व्हिडिओ प्रकरण डॉ. सेजल पवारला चांगलंच भोवणार आहे.. अवयवदान आणि मृतदेहासंबंधी केलेल्या वक्तव्यामुळे केईएम महाविद्यालयात शिकत असलेली डॉ. सेजल पवारवर महाविद्यालयाकडून लवकरच कारवाई करण्यात येणार आहे.. या सगळ्या प्रकरणाची गंभीर दखल रुग्णालय प्रशासनाने घेतलीय.. त्यासंबंधीचा अहवाल रात्रीपर्यंत दोन सदस्य समितीकडून मागविण्यात आलाय.