19 डिसेंबरला देशाच्या राजकारणात मोठी घडामोड घडणार असल्याचा दावा काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय... इस्त्रायलच्या गुप्तहेराने केलेल्या स्टींग ऑपरेशमुळे अनेकजण अडचणीत येण्याची शक्यता आहे... आणि कदाचित पंतप्रधान बदलून मराठी माणूस पंतप्रधानपदी विराजमान होणार असल्याचं मोठं वक्तव्य पृथ्वीराज चव्हाण यांनी केलंय... पिंपरी चिंचवडमधील एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.दरम्यान पृथ्वीराज चव्हाणांच्या विधानंतर महायुतीच्या नेत्यांनी पृथ्वीराज चव्हाणांवर टीका केलीय.. पृथ्वीराज चव्हाण यांना स्वप्न पडतात आणि मग ते गावभर सांगत फिरतात, असा टोला सदाभाऊ खोतांनी लगावलाय.. मुरजी पटेलांनी पथ्वीराज चव्हाणांवर टीका केलीय.. त्यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांनी. दरम्यान, देशाच्या राजकारणात काहीतरी घडतंय, लवकरच समजेल, असं म्हणत विजय वडेट्टीवारांनी पृथ्वीराज चव्हाणांच्या विधानाला दुजोरा दिलाय.. तर पृथ्वीराज चव्हाण ज्योतिषी आहेत का?, असा सवाल प्रवीण दरेकरांनी विचारलाय..