Rehan Vadra यांच्या प्रदर्शनातील फोटो हटवले, फोटो हटवल्याने Priyanka Gandhi आक्रमक, रेहानसोबत बातचीत

दिल्लीतील बीकानेर हाऊसमध्ये आयोजित फोटो प्रदर्शनातून रेहान वाड्रा यांनी काढलेली ७० हून अधिक छायाचित्रं हटवल्याचा दावा समोर आलाय. यावर काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी वाड्रा यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून तीव्र नाराजी व्यक्त केलीय. हा प्रकार देशातील तरुणांच्या आवाजावर आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला असल्याचं त्यांनी म्हटलंय. दरम्यान, प्रदर्शन सुरू होण्यापूर्वी १०० हून अधिक छायाचित्रं होती, मात्र आता ४० पेक्षाही कमी फोटो शिल्लक असल्याची माहिती रेहान वाड्रा यांनी दिलीय. या प्रकरणामुळे आता नव्या वादाला तोंड फुटलंय.

संबंधित व्हिडीओ