KEM रुग्णालयाचं अखेर नामांतर झालंय. KEM रुग्णालयाच्या नावातील 'किंग एडवर्ड मेमोरियल' हे शब्द बदलून त्याऐवजी “कौशल्यश्रेष्ठ एकलव्य स्मारक रुग्णालय” असं नामांतर करण्यात आलंय. त्याबाबतचा प्रस्ताव आरोग्य समितीत मंजूर करण्यात आला असून हा मंजूर प्रस्ताव अभिप्रायासाठी आयुक्तांकडे सादर करण्यात आलाय. मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी KEM रुग्णालयाचं नाव बदलण्याची मागणी केली होती. त्यांनी पालिकेला पाठवलेल्या पत्रानंतर समितीत प्रस्ताव मंजुरीसाठी आला होता.