हडपसरमध्ये घसरगुंडी खेळताना 4 वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झालाय.हडपसर भागातील मगरपट्टा परिसरातील ही घटना आहे.गृहनिर्माण संस्थेच्या आवारात खेळत असताना लोखंडी घसरगुंडी डोक्यावर पडल्याने एका चार वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू झाला. या प्रकरणी हडपसर पोलिसांनी सोसायटीचे अध्यक्ष आणि इतर पदाधिकाऱ्यांविरुद्ध निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे.मयत चिमुरडीचे नाव अनिका नवनाथ देविस्कर आहे. अनिका सोसायटीच्या मैदानात खेळत असताना, तिथे बसवण्यात आलेली जड लोखंडी घसरगुंडी अचानक तिच्या अंगावर आणि डोक्यावर कोसळली. या अपघातात अनिका गंभीर जखमी होऊन बेशुद्ध पडली. तिला तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला