#PuneAirport #IndiGo #FlightCancelled #TravelUpdate #IndigoChaos पुणे विमानतळावरून (Pune Airport) प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी पुन्हा एकदा मनस्ताप देणारी बातमी समोर आली आहे. इंडिगो (IndiGo) विमानसेवेचा घोळ सलग पाचव्या दिवशीही कायम असून, काल दिवसभरात पुणे विमानतळावरून तब्बल ६९ विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. यामध्ये आगमन होणारी ३४ आणि उड्डाणे घेणारी ३५ विमाने रद्द झाली आहेत. विमानांचा हा बोजवारा उडाल्यामुळे प्रवाशांचे विमानतळावर प्रचंड हाल झाले. पुणे विमानतळावर काल केवळ २२ विमानांचे आगमन तर २५ विमानांचे उड्डाण होऊ शकले. इंडिगो कंपनीच्या या सावळा गोंधळामुळे प्रवाशांच्या सुट्ट्या आणि महत्त्वाचे नियोजन कोलमडले आहे. पुणे विमानतळावरील या संकटाचे संपूर्ण अपडेट्स आणि प्रवाशांची काय परिस्थिती आहे, पाहा हा रिपोर्ट. Another distressing news has come to light for passengers travelling from Pune Airport. The disruption of IndiGo flights has continued for the fifth consecutive day, with as many as 69 flights cancelled from Pune Airport yesterday. Of these, 34 were arriving and 35 were departing. This disruption of flights has caused immense inconvenience to passengers at the airport. Only 22 flights arrived at Pune Airport yesterday and 25 were able to take off. This chaos by IndiGo has disrupted the vacations and important plans of passengers. For complete updates on this crisis at Pune Airport and the situation of passengers, see this report.