Pune| महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न, पुतळ्यावर चढणारा सुरज शुक्ला ताब्यात

पुणे रेल्वे स्थानकाबाहेर काल रात्री एका तरुणाने महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. भगवी वेशभूषा परिधान केलेल्या या व्यक्तीने पुतळ्याच्या पायथ्याशी चढून शस्त्राचा वापर करून त्याचा शिरच्छेद करण्याचा प्रयत्न केला. स्थानिक सुरक्षा रक्षकांनी तातडीने हस्तक्षेप केला आणि कोणतेही नुकसान होण्यापूर्वीच हे कृत्य रोखले. आरोपीला तात्काळ अटक करून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. पोलिस अधिकाऱ्यांनी पुष्टी केली की तरुणाला ताब्यात घेण्यात आले आहे आणि सध्या त्याची चौकशी सुरू आहे.

संबंधित व्हिडीओ