पुण्यातील सिंहगड रोड परिसरात भरदिवसा दरोडा टाकण्यात आलाय.बंदुकीचा धाक दाखवत 25 ते 30 तोळे सोनं लूटलं, विशेष म्हणजे दरोडा टाकणाऱ्यांकडील ही बंदूक खेळण्यातली होती. सिंहगड रस्त्यावर असलेल्या ज्वेलर्सच्या दुकानात हा दरोडा टाकलाय, ही घटना नांदेड सिटी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील धायरी परिसरात घडलीय.सोनं खरेदीच्या बहाण्याने दुकानात आले दुकानचालकावर खोटी बंदूक रोखली आणि 25 ते 30 तोळं सोनं लुटलं.