पुण्यातील मॉडेल कॉलनीतील जैन बोर्डिंग प्रकरणाला आता मोठा पाठिंबा मिळणार आहे.या वादग्रस्त जमीन व्यवहाराविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला आता अण्णा हजारे यांचा पाठिंबा मिळणार असल्याचे समोर आले आहे.माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या सातत्याने आरोपानंतर जैन समाज आणि विविध संघटना गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणी सक्रिय आहेत. दरम्यान, अण्णा हजारे यांचे वैद्यकीय सल्लागार डॉ. गंगवाल यांनी सांगितले की, “अण्णा हजारे लवकरच पुण्यातील शिवाजीनगरच्या मॉडेल कॉलनी येथील जैन बोर्डिंग येथे येऊन आंदोलनाला समर्थन देतील. या घडामोडीनंतर जैन बोर्डिंग प्रकरणाला नव्या राजकीय आणि सामाजिक दिशेने गती मिळण्याची शक्यता आहे डॉ गंगवाल यांच्याशी यासंदर्भात बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांनी