पुण्यात चक्क चोरट्याने ३३ पेटी आंबे पळवलेत. पुण्यातील कोंढवा बुद्रुक परिसरात येवलेवाडी येथे प्रकार घडलाय. कात्रज कोंढवा रोडवर असलेल्या एका प्रसिद्ध हॉटेल लगत आंब्याचे दुकानातून तब्बल ३३ पेटी चोरी गेल्यात. या प्रकरणी येवलेवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून पोलिस तपास करत आहेत.जवळपास १ लाख ८ हजार रुपये किमतीचे आंबे चोरीला गेले असल्याचे पोलिस गुन्ह्यात लिहले आहेत.अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.