पुण्यात बांधकाम क्षेत्रात मोठा गैरप्रकार झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय.खोट्या ATC परवानगीवर उंच इमारतींना मंजुरी देण्यात आलाचा दावा तक्रारदार अनंत घरत यांनी केलाय. त्यामुळे आता बिबवेवाडी, सिंहगड रोड, आंबेगाव परिसरातील प्रकल्प संशयाच्या भोवऱ्यात अडकलेत. संरक्षण मंत्रालयाकडून काही परवानग्या अवैध असल्याची माहिती RTI मधून उघड झालं असून गांधीनगर येथील कार्यालयाकडूनही खोटी परवानगी घेतल्याचा आरोप करण्यात आलाय. दरम्यान अनधिकृत बांधकामांवर कारवाई करावी आणि संबंधित अधिकाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई करावी अशी मागणी तक्रारदार अनंत घरत यांनी केलीय.