Pune | मॉडेल कॉलनीतील जैन बोर्डिंग प्रकरणात नवा खुलासा, जैन मंदिरच गहाण ठेवून 70 कोटींचा व्यवहार?

पुण्यातील मॉडेल कॉलनीतील जैन बोर्डिंग संदर्भातील वाद अधिकच गडद होत चालला आहे.... या प्रकरणात एक धक्कादायक बाब पुढे आली असून बोर्डिंग परिसरातील जैन मंदिरच गहाण ठेवून तब्बल ७० कोटी रुपयांचा व्यवहार केल्याचे समोर आले आहे...कोणतीही चौकशी न करता ८ ऑक्टोबरला बिरेश्वर क्रेडिट सोसायटीने यांनी ५० कोटी रुपये आणि बुलढाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक यांनी २० कोटी रुपये देऊन हा व्यवहार पूर्ण केल्याचे उघड झाले आहे... या संदर्भात विद्यार्थी चंद्रकांत पाटील याने सोशल मीडियावर एक पोस्ट केल्यानंतर या प्रकरणाने नवे वळण घेतले. त्यांच्या या पोस्टनंतर त्यांना कर्नाटकातून पोलिसांचे धमकीचे फोन आलेत.

संबंधित व्हिडीओ