अभिनेता राहुल सोलापूरकर यांच्या घराबाहेर पोलिसांनी बंदोबस्त वाढवला. सोलापूरकरच्या घराबाहेर पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आलेत. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यानंतर राहुल सोलापूरकरांच्या विरोधात शिवप्रेमी आक्रमक झाले. आणि त्या पार्श्वभूमीवर घराबाहेर बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.