पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान laser show वर बंदी घालण्यात आली आहे. पुणे पोलीस प्रशासनानं हा निर्णय घेतलाय. विसर्जन मिरवणुकीत laser beam light लावली तर मंडळांवर कारवाई केली जाणार आहे. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी ही माहिती दिली आहे. पुणे पोलीस आयुक्तांनी गणेश मंडळांसोबत आयुक्तालयात बैठकही घेतली आहे आणि याच वेळेस हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय.