पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी माजी आमदार दत्तात्रय सावंत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. सावंत यांनी एक अपक्ष आणि रासपच्यावतीने असे दोन उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.पुणे विभाग शिक्षक मतदारसंघासाठी 23 ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून, महायुती आणि महाविकास आघाडीने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. या पार्श्वभूमीवर दत्तात्रय सावंत यांच्या उमेदवारीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.