पुण्यातील खराडी भागातील रेव्ह पार्टीत पोलिसांनी छापेमारी केली. रात्रीच्या सुमारास ही कारवाई झालीय. या पार्टीत मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ, दारु हुक्क्याचं सेवन सुरु होतं. यात दोन महिला, पाच पुरुषांचा सहभाग होता... धक्कादायक म्हणजे यात एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकरचाही सहभाग होता.रेव्ह पार्टी प्रकरणातील ७ ही जणांची वैद्यकीय तपासणी पूर्ण झाली.वैद्यकीय तपासणीच्या प्राथमिक अहवालात ७ पैकी २ जणांनी दारुचं सेवन केल्याची माहिती समोर आली.दरम्यान, याप्रकरणी सर्व आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. सर्वांचे रक्त आणि लघवीचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले.दरम्यान एकीकडे पोलीस छापेमारी करत होते, त्यानंतर काही वेळातच पोलिसांनी खेवलकरच्या घरी छापा टाकलाय...यावेळी पोलिसांनी हार्डड्राईव्ह आणि लॅपटॉप जप्त केलाय...