पुण्यातील खराडी परिसरात एका रेव्ह पार्टीवर पोलिसांनी केलेल्या कारवाईत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) नेत्या रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आज (सोमवार) सकाळी ११ वाजता पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची रोहिणी खडसे यांनी भेट घेणे नियोजित होते, मात्र ही भेट अचानक रद्द करण्यात आली आहे.