Pune| अवैध बांधकामांनी झाकोळला शिवनेरी किल्ला; याचसंदर्भात सामाजिक कार्यकर्ते तानाजी तांबेंशी बातचीत

पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मस्थळ म्हणून ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा किल्ला आहे पण आज अवैध बांधकामांच्या विळख्यात सापडल्याचे वास्तव समोर आले आहे. जुन्नर शहरातील छत्रपती शिवाजी चौक येथून शिवनेरी किल्ला स्पष्ट दिसत नसल्याची धक्कादायक बाब सामाजिक कार्यकर्ते तानाजी तांबे यांनी उघडकीस आणली आहे. किल्ल्याभोवती गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या अवैध बांधकामांमुळे हा ऐतिहासिक वारसा झाकोळला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर तांबे यांनी नागरिकांना जागृत करण्यासाठी सह्यांची मोहीम हाती घेतली.

संबंधित व्हिडीओ