Pune शिक्षक निवडणुकीत महायुतीत मिठाचा खडा ? पुणे शिक्षकवरुन फडणवीस, शिंदेंमध्येच मतभेद ? NDTV मराठी

पुणे शिक्षक मतदारसंघातून शिंदे शिवसेनेकडून सचिन सानप यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलीय.गुरुवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सचिन सानप यांनी पाठिंबा जाहीर केला होता. त्यानंतर आज प्रसिद्धी पत्रक काढण्यात आलंय.एकीकडे खुद्द एकनाथ शिंदे यांनीच सानप यांना खुला पाठिंबा दिलाय. दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र शिवसेनेचा प्रत्येक पदाधिकारी, नेता, आमदार, खासदार भाजप उमेदवाराचंच काम करेल असं म्हटलं होतं. त्यामुळे पुणे शिक्षक मतदारसंघावरुन थेट फडणवीस आणि शिंदे यांच्यातच मतभेद निर्माण झाल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु झालीय

संबंधित व्हिडीओ