पुण्यातील कोंढवा परिसरात मोठी दुर्घटना टळली आहे. लुल्लानगर चौकात बांधकामाच्या सीमा भिंतीला लावलेला पत्रा अचानक कोसळला. या दुर्घटनेत दोन जण जखमी झाले असून त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. घटनेनंतर अग्निशमन दल आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास सुरू आहे.