Pune| डिंभे धरणातून 1 हजार 800 लिटर प्रति सेकंद वेगाने पाण्याची गळती; तातडीने गळती थांबवण्याची मागणी

डिंभे धरणाच्या भिंतीमधून तब्बल 1 हजार 800 लिटर प्रति सेकंद वेगाने पाण्याची गळती होत असल्याची माहिती आहे.. या गळतीमुळे दररोज सुमारे 15 कोटी 55 लाख लिटर पाणी बाहेर जात आहे. गळतीचा हा वेग कायम राहिल्यास वर्षभरात जवळपास 2 TMC पाणी गळतीतून बाहेर जाऊ शकते. दरम्यान, 2026-27 मध्ये परिसरात तब्बल 21 हजार 392 हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी झाली आहे. भात, सोयाबीन, मका, बटाटा आणि ऊस यासारख्या पिकांसाठी आगामी काळात पाण्याचे नियोजन महत्त्वाचे असताना धरणातील मोठ्या गळतीमुळे पाणीसाठ्यावर परिणाम होण्याची चिंता व्यक्त केली जात आहे. धरणाची गळती थांबवून दुरुस्ती आणि मजबुतीकरण तातडीने करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

संबंधित व्हिडीओ