Pune | डिंभे धरणाच्या पाणीपातळी खालावली, धरणाचा पाणीसाठा केवळ 27% वर; याचस्थितीचा घेतलेला आढावा

पुणे जिल्ह्यातील डिंभे धरणाच्या पाणी पातळीची परिस्थिती विशेष चिंताजनक बनली आहे. कुकडी पाटबंधारे प्रकल्पांतर्गत येणाऱ्या या धरणाचा पाणीसाठा केवळ सुमारे 27 टक्क्यांवर आला आहे.या घटत्या पाणीसाठ्यामुळे शेतीसाठी तसेच पिण्याच्या पाण्यासाठी भविष्यात अडचणी निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेता राज्यातील धरणांमधील आवर्तन बंद करण्यात आले असून, उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन करण्यावर भर दिला जात आहे.

संबंधित व्हिडीओ