राफेल विमानानं भारतीय नौदलाची विमानवाहू युद्धनौकी आयएनस विक्रांतवर यशस्वी लँडिंग केलं.
त्याचा व्हिडिओ भारतीय नौदलानं जारी केलाय. पहिल्याच प्रयत्नात राफेल यशस्वीपणे विमानावर लँड झालं.
२९ ऑक्टोबरला हा सराव घेण्यात आला. ही युद्धनौक लवकरच नौदलात कार्यान्वित केली जाणार आहे
त्यादृष्टीनं ही चाचणी महत्त्वाची आहे. राफेल मरीन फाइटर जेटने हे पहिल्याच प्रयत्नात हे यशस्वी लँडिंग केलं.
राफेल मरीन हे फ्रेंच नौदलाचं लढाऊ विमान आहे. चाचणीवेळी हे विमान फ्रेंच पायलटनंच सांभाळलं.
अद्याप भारताला राफेल मरीन ही विमानं मिळाली नसलं तरी आयएनएस ही भारतीय बनावटीची युद्धनौका आहे आणि त्यादृष्टीनं या चाचणीला महत्त्व आहे. थोडक्यात भारतीय बनावटीच्या युद्धनौकेवर परदेशी बनावटीचं विमान उतरवणं याची ही चाचणी घेतली गेलीय. दरम्यान, भारतीय नौदलासाठी २६ राफेल मरीन विमानांचा करार झालाय.