दक्षिण चीन समुद्रात यंदाच्या हंगामातलं सर्वात शक्तीशाली वादळ तयार झालं आणि या आठवड्याच्या सुरुवातीपासूनच त्यानं त्याचे रौद्ररुप दाखवायला सुरुवात केलीय. सोमवारी फिलीपाईन्सला धडक दिल्यानंतर ते पुढे जसंजसं निघालं तसतसं त्यानं आपला वेग वाढवला आणि तैवानमध्ये तर तब्बल ताशी २०५ किमी वेगानं धडकलं... पुढेही चीन, हाँगकाँगला झोडपून काढतंय... रागासा या नावानं आलेलं हे वादळ नेमका काय धुमाकूळ घालतंय. कोणत्या देशात सध्या काय स्थिती आहे पाहूया एक रिपोर्ट.