9 तासांचं ठिय्या, ताब्यात घेतलेल्या Rahul- Priyanka Gandhi यांना दिल्ली पोलिसांनी सोडलं

देशाची राजधानी दिल्लीत आज इंडिया आघाडीचा आक्रमक पवित्रा पाहायला मिळाला. राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह विरोधी पक्षातील इतर खासदारांनीही आंदोलनात सहभाग घेतला. खासदारांनी निवडणूक आयोगाच्या कार्यालयाबाहेर हल्लाबोल केला. निवडणूक आयोगाच्या प्रमुखांच्या भेटीसाठी खासदार आकाशवाणी भवन इथे जमले होते. मात्र आयोगाने भेट नाकारल्यामुळे राहुल गांधींनी तब्बल नऊ तासांहून अधिक काळ ठिय्या दिला. अखेर दिल्ली पोलीसांनी राहुल गांधींसह सर्व खासदार, आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.. काही वेळानंतर त्यांची सुटकाही करण्यात आली..

संबंधित व्हिडीओ