#Raigad #BharatGogawale #SunilTatkare स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी रायगड जिल्ह्यात राजकीय वातावरण तापले आहे. मंत्री भरत गोगावले यांचे अत्यंत विश्वासू सहकारी मानले जाणारे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रमेश मोरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. सुनील तटकरे यांनी गोगावलेंना मोठा धक्का दिला असून, जिल्ह्यातील राजकीय वाद वाढत आहे.