पश्चिम रेल्वेच्या वैतरणा रेल्वे स्थानकावर रेल्वे ट्रॅक ला तडा गेला आहे. पश्चिम रेल्वेवरील लोकल वाहतूक त्यामुळे उशिरानं होत आहे. मुंबईकडे येणाऱ्या अप लाईन वरील रेल्वे ट्रॅक ला तडा गेलाय. त्यामुळे मुंबईकडे येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांवरती याचा परिणाम झालाय.