दसऱ्याला राज्यातील बहुतांश भागात पाऊस बरसण्याचा अंदाज आहे. पुढील काही दिवसांत रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. मुंबई आणि ठाण्यातही रविवारी हलक्या सरी बरसण्याची शक्यता आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील धाराशिव जिल्ह्याला उद्या पावसाचा यलो अलर्ट देण्यात आलाय.पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सांगली, साताऱ्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे.