रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची पुन्हा दमदार एन्ट्री झालीय, रात्रभर पावसाची संततधार आणि नद्यांच्या पाणीपातळीतही चांगली वाढ झालीय, गेल्या 24 तासात रत्नागिरी जिल्ह्यात 114.88 मिलिमीटर पावसाची नोंद झालीय, आज सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे खेडच्या जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडलीय त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशाराही दिलाय..