Raj Thackeray | "मराठी कलावंत कुठून कुठे पोहोचले, मात्र त्याची दखल महाराष्ट्र सरकारने घेलेली नाही"

 सदाशिव साठेंच्या आत्मकथनावर आधारित पुस्तक प्रकाशन सोहळ्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे बोलत होते. हा ध्यास जीवनाचा पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडलेला आहे. यावेळी त्यांनी बोलताना बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिलेला आहे तसेच सरकारवरही निशाणा साधलेला आहे. पुतळ्यांकडून, पुतळ्यांची मागणी काय करायची मी सरकारकडे शब्द टाकणार नाही. जे काही करायचं आहे ते आपण करू असं वक्तव्य यावेळी राज ठाकरेंनी केलेलं आहे. कलावंतांची देखील बाजूही त्यावेळी राज ठाकरेंनी मांडलेली आहे. कलावंतांनी खंत व्यक्त करणारा देश कुठला असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे. सरकारकडून जास्त अपेक्षा ठेवू नका असं देखील वक्तव्य यावेळी राज ठाकरेंनी केलेलं आहे. एवढीच अपेक्षा असेल तर माझ्या हाती सत्ता द्या असं देखील विधान यावेळी बोलताना भाषणावेळी राज ठाकरेंनी केलेलं आहे.

संबंधित व्हिडीओ