पाकिस्तान आधीच बरबाद झालेला देश आहे, त्याला अजून काय बरबाद करणार तुम्ही ? हल्ला करणारे अतिरेकी तुम्हाला सापडलेले नाहीत. हजारो पर्यटक जिथे वर्षानुवर्षे जात आहे तिथे सुरक्षा का नव्हती हे प्रश्न जास्त महत्त्वाचे आहे. आपल्या देशात कोंबिग ऑपरेशन करून यांना हुडकून काढणे गरजेचे आहे. एअर स्ट्राईक करून, लोकांना भरकटवून, हा काही पर्याय अथवा उत्तर होऊ शकत नाही. सरकारच्या चुका तुम्हाला दाखवल्याच पाहीजे. मॉक ड्रील, एअर स्ट्राईक करणे हे काही या गोष्टीवर उत्तर नाही. अतिरेक्यांना शोधून काढत त्यांचा बंदोबस्त करणे आणि देशभर मॉक ड्रील करण्यापेक्षा कोंबिग ऑपरेशन करा. - राज ठाकरे