हुतात्मा स्मारकाच्या सजावटीवरून राज ठाकरेंनी सरकारवर निशाणा साधलाय. हुतात्मा स्मारकाची सजावट नीट नव्हती, वरती बसलेले वरिष्ठ ज्या राज्यातून येतात त्या राज्याच्या मनात मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला याची सल आहे का असाही सवाल उपस्थित केला तर महाराष्ट्र दिन सुतकी पद्धतीने साजरा केला जातोय असंही राज ठाकरे म्हणालेयत.हुतात्मा स्मारकाजवळ कशाप्रकारे सजावट केली होती याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी जुई जाधवने